बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीतील एमआयडीसीमध्ये लोखंडी पाइप तयार करणाऱ्या आयएसएमटी कंपनीत सकाळी साडे दहाच्या सुमारास सकाळ शिफ्ट मध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कामगाराचा डोक्यात लोखंडी रॉड पडल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी बारामतीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
संतोष देवकाते,वय ३० रा.मेखळी,ता.बारामती,जि.पुणे असे मृत्यू झालेल्या कामगारांचे नांव आहे.काम करीत असताना संरक्षणासाठी सेफ्टी म्हणून त्या कंत्राटी कामगाराला पुरेशी सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप मृत्यू झालेल्या कामगाराच्या नातेवाईकांनी कंपनीच्या मॅनेजमेंट वर केला आहे.यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.नातेवाईकांनी खाजगी दवाखान्यात मोठी गर्दी केली आहे.