Pune Crime : विकृत बापच मुलीला दाखवत होता पोर्नोग्राफी व्हिडिओ;बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ,आई वडिलांसह बहिणीवर गुन्हा दाखल..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

वर्क फ्रॉम होम करत असलेल्या एका २३ वर्षाच्या युवतीला तिचे विकृत वडिल जबरदस्तीने घरातील कॉम्प्युटर व त्यांचे मोबाईलवर पोर्नोग्राफीचे व्हिडिओ दाखवत तिचा विनयभंग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तसेच तिची आई व बहिण हे घरगुती कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी युवतीचे वडील आई व बहिणीवर विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार २०१० ते २०२१ दरम्यान येरवडा येथील कल्याणी नगर मधील एका सोसायटीत सुरु होता.फिर्यादी तरुणी ही एका कंपनीत सध्या काम करीत असून तिचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे.फिर्यादीचे वडील हे तिची इच्छा नसताना वेळोवेळी घरातील कॉम्प्युटर व त्यांच्या मोबाईलवर पोर्नोग्राफी व्हिडिओ दाखवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन केले. तिची आई व बहिण यांनी फिर्यादी यांना घरगुती कारणावरुन शिवीगाळ करत मारहाण केली.बहिणीने फिर्यादीचे अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ काढले,असे फिर्यादीत नमूद केले आहे.फिर्यादीने आपली तक्रार प्रथम हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली होती.तेथून ती वर्ग होऊन येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *