सोमेश्वरनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
अरबी समुद्रातील शिव स्मारकाबाबत माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तत्कालीन भाजपा सरकारने मताच्या राजकारणासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरत जनतेच्या भावनेशी खेळ केला असून,अरबी समुद्रातील शिवस्मारकाची प्रत्यक्षात एकही वीट उभी न करता कोटीत रुपयांची उधळणी केल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे.
याबाबतची माहिती बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना यांना मिळाली असून, या सर्व भ्रष्ट कामाची लवकरच राज्य सरकारकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे आरटीआय कार्यकर्ते यादव यांनी सांगितले आहे.यात महत्वाचे म्हणजे या कामासाठी सल्लागार म्हणुन मे.इजिस इंडीया या कंपनीची नेमणुक करुन तब्बल ९४.७० कोटी रुपये कन्सलटंसीसाठी कामासाठी मंजुर करण्यात आले. इतकेच नाही हे जे काम २५८१ कोटी रुपयांना एल ॲन्ड टी या कंपनीस देण्यात आले होते.
यानंतर या कामाची पुन्हा रक्कम वाढवत हे काम ३६४३.७८ कोटी रुपयांवर सुधारीत प्रशासकीय मान्यता देत देण्यात आले. म्हणजेच सुधारीत प्रशासकीय मान्यतेने तब्बल १०६२ कोटी रुपयांची वाढ या कामात करण्यात आली असुन हे धक्कादायक आहे.या कामासाठी एकुण मंजुर रक्कमेपैकी तब्बल २५७३.३२ लक्ष रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती मिळाली असल्याचे नितीन यादव यांनी सांगितले.