बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त ढेकळवाडी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बहुजनांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर व समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे यशवंत ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष बापुराव सोनवलकर, संपतराव टकले, वसंतराव घुले यांनी सांगितले.
गेली दोन वर्ष कोरोणामुळे जयंती होऊ शकली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी मोठ्या उत्साहात जयंती साजरी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथे रविवार (दि:२९) मे रोजी (सायं ६ वाजता) सालाबाद प्रमाणे यावर्षी अहिल्यादेवी जयंतीचे औचित्य साधून” बहुजन मेळाव्याचे” आयोजन करण्याचे ठरवले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अखंड राष्ट्राला एकजूट ठेवण्याचे काम एक महिला म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सक्षमपणे पार पाडले.अखंड भारतामध्ये लोक कल्याणकारी राज्य केले आहे.कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला.तसेच अहिल्यादेवींनी पिण्याच्या पाण्यासाठी अनेक बारवा देखील बांधल्या, त्यावेळी गोरगरिबांसाठी अनेक ठिकाणी अन्नछत्र देखील चालू केले,त्यामुळे त्यांना पुण्यश्लोक म्हटले जाते.