Baramati News : बारामती प्रशासकीय भवनचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकासमोरील गेट तात्काळ उघडा – मंगलदास निकाळजे


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक बारामती समोर असलेले प्रशासकीय भवनचे मुख्य प्रवेशव्दार प्रशासकीय भवन निर्माण झाल्यापासून बंद आहे सदरील मुख्य प्रवेशव्दार हे चालु करणे अत्यंत गरजेचे आहे कारण लोकांना पाठीमागील दाराने विनाकारण जावे लागत आहे एस टी स्टॅड पासून मुख्याप्रवेश द्वार हे जवळचा आणि सोपा मार्ग आहे तसेच ते दार उघडल्याने समोर राहत असणारे अनुसुचित जाती जमातीतील लोक पुढे झेरॉक्स, टायपिंग, हॉटेल व इतर प्रकारची दुकाने टाकून आपली आर्थिक प्रगती करतील व अनुसूचित जाती जमातीला मुख्य प्रवाहात आणण्याचा हेतु साध्य होईल.

तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समोरील गेट उघडल्यानंतर समोर स्वच्छता देखील राहिल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समोर असलेले नवीन प्रशासकीय भवनने मुख्य प्रवेशव्दार लवकरात लवकर उघडून सात दिवसात खुले करावे नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचे कळवले होते परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १९ मे २०२२ रोजी आंबेडकरी स्टाईलने आंदोलनास करणार आहे असे निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे,शहर अध्यक्ष जितेंद्र कवडे,सिद्धार्थ सोनवणे,आकाश लांडगे,कृष्णा साळुंके,सिद्धार्थ पवार, कुणाल लांडगे,सागर बंटी सरवदे,रितेश कांबळे,मानव उगाडे,कृष्णा क्षीरसागर,प्रशांत सरतापे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *