Daund Crime : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्यापही फरार..!!


दौंड पोलिसांची कामगिरी पाहता,त्यांना एक आरोपी सापडत नाही हे दौंड पोलिसांचे अपयश तर नाही ना ?

दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

अल्पवयीन मुलगी घरात एकटी आहे हे पाहुन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या काकाच्या घरी,प्रिन्स लॉज,टेंभुर्णी येथील लॉज आणि भिगवण येथील निर्जनस्थळी घेऊन जात तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपी कुलदीपसिंह पांडुरंग कदम (रा.चिखली,ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर ) याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३७६,३१५,५०६, ३४, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी २१ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे.गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्यापही फरार आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,पीडित मुलीला वडील नसल्याने,२०१७ साली कॉलेजसाठी आपल्या काकांकडे राहत होती.पीडितेचे काका संशयित आरोपीचे चुलत मामा लागत असल्याने,आरोपीचे त्यांच्या घरी येणेजाणे असायचे.एके दिवशी कोणीही घरात नसल्याचा फायदा घेत कुलदीपसिंह यांने घरी जात तिच्यासोबत गप्पा मारत,पीडितेला लग्नाची मागणी घेतली,आपण दोघे लग्न करू,आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असे बोलत युवतीबरोबर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.त्यामुळे आरोपी हा वारंवार पीडितेशी संभोग करू लागला.

त्याला विरोध केला असता,त्याने युवतीला काही वेळा लग्नाचे आमिष दाखवले व काही वेळा जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक संबध ठेवले.पीडित युवती ही १२ पास झाल्यानंतर कॉलेजसाठी बारामती येथे आली असता,कुलदीपसिंह यांने आपल्या फॉर्च्यूनर गाडी क्र.MH.12.LD.999 व दुसरी गाडी क्र.MH.14.EN. 4599 या गाड्यामधून घेऊन जात भिगवण रोडवरील प्रिन्स लॉजवर,इंदापुर टेंभुर्णी रोडवरील लॉजवर घेऊन जात पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले.शारीरिक संबध ठेवल्याने पीडित युवती गर्भवती राहू नये यासाठी कुलदीपसिंह याने वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या होत्या तसेच बारामती व भिगवण रोडवर घेऊन जात जबरदस्तीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.त्यानंतर युवतीला त्रास होऊ लागल्याने तिला बारामती बस स्टँड जवळील हॉस्पिटल येथे जाऊन तिची तपासणी करून डॉक्टरांना गर्भधारणा झाल्याने डॉक्टरांनी पीडितेला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला.

परंतु आरोपीने पीडितेला गर्भधारणा होऊ नये म्हणून मेडिकल मधून गोळ्या आणून देत,त्या गोळ्या ६ दिवस दोन वेळा खायला सांगितल्या.या घटनेनंतर आरोपीचे वडील पांडुरंग कदम हे पीडितेला बारामती येथील पुनावाला गार्डन येथे बोलावून घेतले.माझ्या मुलाशी तुझा विवाह लावून देतो तू माझ्यावर भरोसा ठेव असा शब्द आरोपीच्या वडिलांनी पीडितेला शब्द देत जानेवारी महिन्यात तुमचे लग्न लावून देतो.तो पर्यंत तुम्ही एकमेकांना भेटत जा. व झालेला प्रकार हा कोणालाही सांगू नकोस,असे बोलत पीडितेला दमदाटी व धमकी दिली.

त्यानंतर देखील आरोपीने पीडितेला विश्वासात घेऊन तुझ्यासोबत लग्न करतो असे बोलत पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.” आरोपीने २०१६ पासून २०२२ च्या दरम्यान कुरकुंभ येथील काकांच्या घरी,विविध ठिकाणी लॉजवर घेऊन जात पीडित युवती अल्पवयीन असताना देखील, २०२२ पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करत गर्भधारणा होऊ नये यासाठी वेगवेगळ्या गोळ्या खायला देवुन आरोपीच्या वडिलांनी लग्न लावून देतो व झालेला प्रकार कोणाला सांगू नकोस असे म्हणत युवतीला दमदाटी करून धमकी दिली.असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे. याबाबत आधीक तपास दौंड पोलीस करीत असून,आरोपी अद्यापही फरार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *