बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळेवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत.शनिवारी ठाणे पोलीसांनी केतकीला अटक केली आहे.अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात आतापर्यंत १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. ठाणे,अकोला,पवई,मुंबई,गोरेगाव,मुंबई,अमरावती,नाशिक,पुणे,पिंपरी-चिंचवड,धुळे,सिंधुदुर्ग,उस्मानाबाद,सातारा याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशातच आता केतकी चितळेवर बारामतीत देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे,बारामती तालुका वारकरी संप्रदायाच्या आणि बारामती तालुका कामगार संघटनेच्या वतीने तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये वारकरी संप्रदायाकडून देखील केतकी चितळेचा निषेध व्यक्त केला जातो आहे.अभिनेत्री केतकी चितळेने साधू संतांच्या नावाला काळिमा फासण्याचं काम केलं आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
स्वत: च मत व्यक्त करत असताना चितळेन महाराजाच्या नावाचा उल्लेख करणं म्हणजे “काहीतरी देऊ काशीची लंगोटी नाठाळाच्या माथी मारू काठी” ..साधू संताना बदनाम करून,साधू संतांच्या नावाचा दुरुपयोग करून स्वत:च मत साधू संतांच्या नावाने बनवून तुका म्हणे अस म्हणण्यापेक्षा स्वत: म्हणायचं आणि तुका म्हणे म्हणून त्यांच नाव घेऊन स्वतःच मत समाजाला लादायच अशा प्रकारचा एक दुटप्पीपणा केतकी चितळेच्या माध्यमातून झाला आहे.तसेच केतकी चितळे हिने शरद पवारांच्या शारीरिक आजारावरती गलिच्छ भाषा वापरून तुकाराम महाराजांच्या अभंगाचा वापर केला असून,महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी ही घटना नसणारी नसून यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखवल्याने चितळे वर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून आणि बारामती तालुका कामगार संघटनेच्या वतीने देखील करण्यात आली आहे.