स्मृती इराणींच्या कार्यक्रमात भाजप अन् राष्ट्रवादीत राडा..
पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळांल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. याप्रकरणी भाजपच्या तिघांवर डेक्कन पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३५४, ५०४,५०६ आणि ३४ नुसार कारवाई केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात काल हा राडा झाला. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या होत्या.हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायला उठल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले.यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामुळं चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.
यानंतर पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.या घटनेनंतर बोलताना नागवडे म्हणाल्या होत्या की, मेरिएट हॉटेलला आम्हाला स्मृती इराणींना भेटू दिलं नव्हतं.त्यामुळं आम्ही बालगंधर्व रंगमंदिरात शेवटच्या रांगेत जाऊन बसलो.त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली.त्यानंतर आम्हीही राष्ट्रवादीच्या घोषणा दिल्या.यानंतर भाजपमधील पुरुष कार्यकर्ते आले आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला.भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी जुमानलं नाही.आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल,असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
बातमी कोट :
पोलिसांच्या कारवाईबद्दल वैशाली नागवडे म्हणाल्या की,भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे.या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं आहे. या आरोपींना वेळीच अटक व्हायला हवी.पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.
वैशाली नागवडे ( राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे विभागीय अध्यक्षा )