इंदापुर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन, पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन व ड्रीम्स् अकॅडमी सराटी यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रीम्स् राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा २०२२ बक्षीस वितरण व क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक १५ मे रोजी इंदापूर येथील आय कॉलेज मधील मैदानामध्ये राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी प्राप्त होते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ड्रीम्स् अकॅडमीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ड्रीम्स् राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा २०२२ चे आयोजन केले होते. धावणे,लांब उडी,गोळा फेक,थाळी फेक या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात विविध वयोगटात ही स्पर्धा झाली.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला.जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक संतोष ननवरे यांना क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच राष्ट्रीय पातळीवर उच्चतम क्रीडा नैपुण्य मिळवले पृथ्वीराज नलवडे ,शंतनू उचाळे ,रोहित चव्हाण, संदीप साखरे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे चेअरमन अभय छाजेड यांनी ड्रीम्स् अकॅडमीचे कौतुक केले.ड्रीम्स् अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून समर्पित भावनेने ते कार्य करीत असल्याने यातून राष्ट्रीय खेळाडू तयार होतील असे मत व्यक्त केले.
राज्यकर उपायुक्त, मोठे करदाते विभाग मुंबईचे चेतन भिंगारे यांनी नवोदित खेळाडू व स्पर्धेत यश मिळविलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे माजी सचिव सुमंत वाईकर, तालुका क्रिडा अधिकारी महेश चावले, ड्रीम्स् अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण नानासाहेब कोकाटे,विश्वस्त अमोल गोडसे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत,काकाजी देवकर मास्जितखान पठाण, कुमार गायकवाड,सत्यशील पाटील,इंदापूर महाविद्यालय प्रभारी प्राचार्य जीवन सरवदे यावेळी उपस्थित होते.ड्रीम्स् अकॅडमीचे विश्वस्त कृष्णदेव क्षिरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी केले.इंदापूर कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ.भरत भुजबळ यांनी आभार मानले.
बातमी कोट :
इंदापूर तालुका क्रीडा क्षेत्रात नावाजलेला तालुका म्हणून ओळखला जातो.कबड्डी, खो-खो सारख्या क्रीडा क्षेत्रात हा तालुका सदैव पुढे असतो. स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची क्षमता या नवोदित युवकांना प्राप्त होत असते.ड्रीम्स् अकॅडमीने क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले असून क्रीडा संकुल अकॅडमी उभा करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’
हर्षवर्धन पाटील ( माजी सहकारमंत्री )