धक्कादायक बातमी ! इंस्टाग्रामवरून मैत्रीनंतर लग्नाचे आमिष दाखवत केला लैंगिक अत्याचार ; झारगडवाडीच्या युवकावर गुन्हा दाखल…!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

लग्नाचे आमिष दाखवत युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या एकावर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३७६,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश गुलाब मासाळ,वय २२ वर्षे (रा.झारगडवाडी, ता.बारामती,जि.पुणे ) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.याप्रकरणी २० वर्षीय पीडित युवतीने फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,बारामती एमआयडीसीत काम करणाऱ्या अविनाश मासाळ या युवकाचे गेल्या नऊ महिन्यांपूर्वी पीडितेशी सोशल मीडियातील इंस्टाग्राम वरून ओळख झाली होती. त्यानंतर हळू हळू दोघेजण एकमेकांना समोरासमोर भेटले,त्यानंतर भेटीचे रुपांतर प्रेमात झाले.आणि त्यातूनच त्यांचे शारीरिक संबंध आले.

संशयित आरोपीने पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बारामती मधील लॉजवर घेऊन जात वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.आणि आता पीडितेने लग्नाची गोष्ट केली तर तर तिला लग्न करणार नाही, लग्नाचा विषय काढला तर तिला धमकी देऊ लागल्याने पीडितेने या त्रासाला कंटाळून फिर्याद दिली.या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पालवे हे करित आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *