मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली.जवळपास एक तास केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. एकंदर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट केलं.उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी मी उपस्थित होतो,एकही शिवसैनिक नव्हता असे वक्तव्य केले होते.
या विधानावरून आज मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणाले, देवेंद्रजी, बाबरी पाडली तेंव्हा तुमच वय काय होतं ? ती काय शाळेची पिकनिक होती ? आज मी तुम्हांला विचारतो, तुम्हीं हिंदुत्वासाठी काय केलतं ? तुम्ही बाबरी पाडायला गेला नव्हता. देवेंद्र जर बाबरी पडण्यासाठी तुम्ही गेला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती.ठाकरे पुढे म्हणाले की, संघ एकदाही भारताच्या स्वातंत्र लढ्यात नव्हता, कुठे होता संघ लढ्यावेळी ?
स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान नाही. संयुक्त लढ्याच्या लढाईतून पहिलं कोण फुटलं तर यांचे बाप म्हणजे संघ…तेव्हा पासून मुंबईचा लचका तोडण्याचं काम सुरु आहे.दरम्यान,उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर काही वेळातच माजी मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. फडणवीस यांनी ट्विट केले की, “सर्वत्र पळापळ अन् गदारोळ,
नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट हा तर निघाला… आणखी एक ‘ #टोमणे बॉम्ब’… जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !!!”