Baramati News : बारामती तालुक्यातील गाव मुक्कामी बंद बससेवा लवकरात लवकर सुरु करण्याची दलित पँथरची मागणी..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

कोरोनाच्या कहरामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली ग्रामीण भागातील मुक्कामी जाणारी बससेवा सुरु करण्यासाठी दलित पँथर बारामती तालुका अध्यक्ष शंतनु साळवे यांनी बारामती आगार व्यवस्थापक गोंजारी यांना निवेदन दिले आहे.शाळा,कॉलेज सुरु झाल्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शारदानगर, माळेगाव, पणदरे,सुपा,मोरगाव सारख्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातात पण त्यांना येजा करण्यासाठी बस बंद असल्याने फार गैरसोय होत आहे.

तसेच ग्रामीण भागातून कामगार वर्ग कामासाठी एमआयडीसी तसेच बारामती शहर या ठिकणी येत असतो पण सकाळी लवकर बस उपलब्ध नसल्याने त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.बस फेरी सुरु झाल्यावर याचा फायदा विद्यार्थी, प्रवासी,कामगार वर्ग,ज्येष्ठ नागरिक यांना होणार आहे.म्हणून बससेवा लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी दलित पँथर तालुका अध्यक्ष शंतनु साळवे यांनी केली आहे.

मुक्कामी बस सेवा येत्या चार पाच दिवसात सुरू करू असे आगार व्यवस्थापक अमोल गोंजरी यांनी सांगितले. यावेळी महेश गायकवाड दलित पँथर प्रदेश उपाध्यक्ष, लालासो धायगुडे प्रदेश कार्याध्यक्ष,अविनाश बनसोडे बारामती तालुका उपाध्यक्ष अशोक भोसले, राहुल पोळ बारामती शहराध्यक्ष इत्यादी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *