यवत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
सोलापुर पुणे हायवेवर पाटसच्या गावच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला यवत पोलिसांनी ताब्यात घेतले असून,तब्बल ४ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी संशयित आरोपी अमित धुल्ला गुडदावत,वय. २४ वर्षे ( रा. शेलारवाडी,गाडामोडी,ता.दौड, जि.पुणे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,यवत पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड यांना माहिती मिळाली की,सोलापूर -पुणे हायवेवरून सोलापूर बाजुकडुन पुणे बाजुकडे मारूती स्वीप्ट एम.एच.१२ ए.टी. ७८९४ ह्या गाडीमधून गावठी हातभटटीची तयार दारू वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्याने पाटस पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी पाटस टोलनाका येथे नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान मारूती स्वीप्ट नं.एम.एच.१२.ए.टी. ७८९४ ही येताना दिसली असता पोलीसांनी गाडी ताब्यात घेत पाहणी केली असता,या गाडीमध्ये ७ गावठी हातभटटी दारूची कॅन्ड आणि गाडीसह असा तब्बल ४ लाख ७१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून,आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,दौंडचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस,यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदशनाखाली सहा.फौजदार सागर चव्हाण,पोलीस हवालदार संजय देवकाते निलेश कदम,गुरूनाथ गायकवाड,अक्षय यादव,रामदास जगताप प्रविण चौधर यांनी केली आहे.