Big Breaking : नाशिक च्या तडीपार असलेल्या गुंडांचा बारामतीत खून… एका तासात आरोपी जेरबंद बारामती तालुका पोलीसांची कारवाई..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जळोची बारामती येथे नुकतेच नवीन सुरू झालेले मातोश्री या हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करीत असलेला गणेश प्रभाकर चव्हाण ( रा. मालेगाव,जि.नाशिक ) याचा त्याच हॉटेलमधील दुसरा कामगार विकास दीपक सिंग,वय.२३ वर्ष (मूळ रा.चंदिगड,पंजाब ) सध्या (रा.अमराई,बारामती जि.पुणे ) याने हॉटेल मधील किरकोळ कामाच्या कारणावरून १३ मे रोजी रोजी २.१५ वा. सुमारास जळोची बारामती येथील मातोश्री हॉटेलच्या आवारामध्ये आरोपीने मयत आचारी याचे अंगावर चेहऱ्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारले.व आरोपी यांनी आपल्या मूळ गावी पंजाबला जाण्यासाठी धूम ठोकली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकातील अंमलदार राम कानगुडे पोलीस नाईक रंजीत मुळीक पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत यांना व नाईट राउंडचे पोलीस अधिकारी लेंडवे व त्यांचे सोबत चे अंमलदार यांना आरोपीला तात्काळ पकडण्या बाबत योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून स्वतः आरोपीचा शोध घेणे कामी मोहीम हाती घेतली. व एक तासाच्या आत चंदिगड पंजाब या मूळ गावी पळून निघालेला आरोपी देवीचे माळ बारामती येथून ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३०२,३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,बारामती विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे,पोलीस उपनिरीक्षक लेंडवे,पोलीस हवा.राम कानगुडे पोलीस नाईक,अमोल नरूटे,रणजीत मुळीक पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत,सहाय्यक फौजदार भागवत या सर्वांनी मिळून केली आहे.

बातमी चौकट :

सर्व हॉटेल मालकांनी यापुढे आपल्या हॉटेलमध्ये कामासाठी ठेवलेले सर्व कामगार यांची माहिती बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे द्यावी तसेच स्वतःकडे त्यांची एक फाईल बनवून ठेवावी . तसेच सर्व कामगारांचे व्हेरिफिकेशन करून ते गुन्हेगार नाहीत याची खात्री करूनच त्यांना कामावर ठेवावे. असे न केल्यास भादवि कलम १८८ प्रमाणे हॉटेल धारक यांच्यावरती कायदेशीर गुन्हे नोंद केले जातील याची दक्षता घ्यावी.

महेश ढवाण ( पोलीस निरीक्षक ) 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *