बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
आपल्याकडे कामाला येत नसल्याचा राग मनात धरून महिलेचे अश्लिल फोटो तिच्या नातेवाईकांसह नवऱ्याला
पाठवणाऱ्या दाम्पत्याविरोधात महिलेची बदनामी केल्याप्रकरणी देवीलाल पेमाराम कुमावत, वय.३० वर्षे (रा.माळेगाव,ता. बारामती,जि.पुणे )व पायल देवीलाल कुमावत या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अक्ट २००० कलम ६७ व भा.द.वि कलम ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २४ वर्षीय मजूर महिलेने फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पीडित महिला व तिचा पती आरोपीकडे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करण्यास होते.त्यावेळेस त्याचे पीडित महिलेसोबत सूत जुळले.त्यानंतर ते व्हाट्सअपवर एकमेकाशी चॅटींग करु लागले एकमेकांच्या नको त्या अवस्थेतील फोटो एकमेकांना शेअर केले.त्या वेळेस प्रकाश याने चॅटिंग दरम्यान व्हाट्सअप वर स्क्रीन शॉट काढून ठेवले.त्यानंतर पीडित महिला व तिचा पती आरोपीकडील काम
सोडून दुसरीकडे गेला.त्यावेळेस प्रकाश व त्याची पत्नी पायल या दोघांनी पीडित महिलेला व तिच्या नवऱ्याला कामाला बोलावले असता पीडितेने नकार दिला.तिने नकार दिल्यानंतर दोघांनी महिलेचे प्रकाश सोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.आणि पीडित महिला व तिच्या पती यांच्या नातेवाईकांना व्हाट्सअप वरून फोटो पाठवत तिची बदनामी केली.या दोघांना ताब्यात घेतले असून,या गुन्ह्यातील मोबाईल जप्त करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.
बातमी कोट :
सोशल मीडियावर अश्लील फोटोग्राफ प्रकाशित करणे फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे त्यामुळे अश्लील फोटो मॅसेज व्हायरल करू नयेत तसं केल्यास तक्रारी प्राप्त झाल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल.
सुनील महाडिक ( पोलीस निरीक्षक )