Baramati Crime : बेकायदेशीर तलवार बाळगल्याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

कसबा परिसरातील जामदार रोड येथील एकावर बेकायदेशीर तलवार बाळगल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश मारुती चांदगुडे,वय.३४ वर्षे ( रा.कसबा,जामदार रोड, बारामती, ता.बारामती ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी शहर पोलीस कर्मचारी तुषार दत्तात्रय चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,शहर पोलीस कर्मचारी शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, जामदार रोड येथील मुक्तीटाउन शिप बिल्डिंग शेजारी एकजण संशयितरित्या फिरताना दिसून आला.या इसमाच्या हातात पांढ-या रंगाच्या कापडामध्ये काहीतरी गुंडाळल्यासारखे दिसल्याने त्याला थांबवुन विचारपूस केली असता,त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने. त्याच्याविषयी संशय आल्याने, त्याची अंगझडती घेत असताना,त्याच्या हातात असणा-या पांढऱ्या कापडामध्ये २१.५ इंच लांबीची लोखंडी पाती असलेली तलवार
बेकायदेशीरित्या मिळुन आली.पंचनामा करून हत्यार जप्त करण्यात आले आहे. कोणताही परवाना नसताना तलवार बाळगल्याचे निदर्शनास आले.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक खाडे हे करीत आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दशरथ कोळेकर,बंडू कोठे, कल्याण खांडेकर,तुषार चव्हाण,इंगोले केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *