Ravindra Kokare Speak : पुण्याईची कमाई आपल्याच हाती..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

“कमविणे अन् गमविणे” हा लपंडाव सुरुच आहे.कमाई कश्याची करावी यावर आपली योग्यात पाहिली जाते.जी कमाई मोजता येते ती संपते ही लाखमोलाची बाब ध्यानात धरा.कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव,नाती, मान,सन्मान,वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाई मध्येच मोजले जाते.आपल्या कमाईत कश्याची मोजदाद आहे. हे तपासून पहावे. आपण जिंदगीभर कमाईच्या पाठीमागे लागलेलो असतो. कमाईत कमवणे अन् उपभोग शून्य.साठवणूक व गुंतवणूक यावरच भर जादा.काही मर्यादित काळापर्यत ठीक आहे.

पण चांगल्या गोष्टीच अतिरेक सुद्धा अनर्थ करतो. वेळीच सावध अन् विरक्त झाल्यास कमाई पुण्याई ठरते.कमाई मंजे धनदौलत,पैका अडका,सोनंनाणं जमीनजुमला, गाडीघोडं,माडी बंगला,हवेली नव्हे. तर ही सारी इस्टेट बापजाद्यांची घामाची असून आपली कर्तबगारी काय ?
बापाच्या कमाईचा रुपाया सव्वा रुपायांत करणं मंजे कमाई एवढाचा त्याचा मतितार्थ नव्हे. संपत्ती अन् संतती एकाच नाण्याच्या दोन भुजा आहेत.संततीच सतप्रवृत्तीची संपत्ती कमाविण्याचे पात्रता कमविणे हीच खरी कमाई होय.सात पिढ्या बसून खातील,आपल्याला काय कमी आहे,नुसतं झाडलं तरी सरायचं नाही,पेटलं तर विझणार नाय. मोप हाय. लक्ष्मी पाणी भरतीया. कुबेर सेवेला. रिद्धी सिद्धी दिमतीला.

आपला नादच खुळा.या भ्रमात आपण वावरत असलो तर नक्कीच आपला खुळखूळा होणार.यात तीळमात्र शंका नाही. मस्तीत आन् धनाच्या जोरावर सारं कमवता येतं या भ्रमातून लवकर बाहेर पडणं शहाणपणाच आहे.”कमविणे अन् गमविणे” ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.कमाई ही धनापरीस विचारांची असावी. परिस्थिती सुदामासारखी असावी. पण त्यांची वैचारिक बैठक भगवंत श्रीकृष्ण यांच्या बरोबर होती. विचाराने सर्व काही कमवता येते. मलाच हवं ही हावरेपणाची कमाई आपणाला एक दिनी नक्कीच रसातळाला हे विधीलिखीतच आहे.संस्काररुपी वागणं,बोलणं जगणं ह्या तीन भुज्या आपणास कमाईच्या गुरुकिल्या आहेत. त्याची जपणूक व संवर्धन महत्त्वाचे आहे.

आपल्या मनातील भावभावना ह्या नेहमी सकारात्मक ठेवल्यास आपली कमाई नेहमीच यश शिखरांवर राहणार यात तीळमात्र शंका नाही.भावना ह्या नेहमी दुसऱ्याच भलं चिंतणा-या असल्या की आपल्या कमाईच्या वाट्यात मुद्लासकट व्याज निरंतर भेटणार.भावनेता खोट नसावी.ती वाहत्या गंगेप्रमाणे निर्मळ,शुद्ध,पवित्र असावी. भावना ही पर्वता सारखी स्थिर असावी.आकाशासारखी विशाल हवी.धरतीगत सर्वाना सामावून घेणारी असावी. अशी भावना आपल्या मनात नेहमी असल्यास भगवंताचा वरदहस्त सतत आपल्या सोबत राहणार. हे निर्विवाद सत्यच आहे.भावनेची कमाई हाताने गमवू नका.

माणुसकी ही धनदौलत ठेवरुपी खात्यात शिल्लक असल्यास कोणताही बाका प्रसंग येऊ द्या. ह्या माणूसकीरुपी कमाईचा १००% फायदा झाला म्हणूनच समजा.माणसा माणसांत स्नेह , माया,आपुलकी,सहकार्य आदरभाव या पंचतत्त्वांचा वापर केल्यास माणुसकुरुपी कमाई अखंडित सेवेशी तत्पर नांदत राहणार.भगवंतावर अगाद विश्वास ठेवा.देवाच नामस्मरण अन् त्यांने सांगितलेले कर्म याचा सुयोग्य वापर केल्यास गमाविलेले सुद्धा परत सव्याज मिळणार.फक्त आपण भगवंताच्या विश्वासास पात्र होणे.कमाईतील काही हिस्सा वाटण्यास ठेवा.

प्रा.रवींद्र कोकरे
ग्रामीण कथाकार
९४२१२१६८२१


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *