महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बीडच्या अंबाजोगाई शहरात लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकला आहे. दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे न पाठवता, तहसिल कार्यालयात जामीन करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोड अंती ४० हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्यानंतर, बीडच्या अंबाजोगाई शहर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाल दिंगबरा सुर्यवंशी,वय-३४ ( रा.कामखेडा, ता. रेणापुर ) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.सुर्यवंशी हे अंबाजोगाई शहर ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी तक्रारदार व त्याचा मित्र यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडे न करता अंबाजोगाई तहसील कार्यालयात करण्यासाठी २६ एप्रिल रोजी तक्रारदारास ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडअंती ४० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले.बीड एसीबीकडून याची पंचासमक्ष खात्री करुन, लाचेची मागणी केल्याप्रकरणी,सुयर्वंशी यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा लाचखोरीने पोलीस प्रशासनातील सुरू असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.