दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे-सोलापूर मार्गावरील दौंड जंक्शन येथे तिसऱ्या विस्तारित कुरकुंभ मोरीचे काम दोन वर्षांहून अधिक काळापासून रेंगाळले होते,आवश्यक संरचना आणि पुशिंग बॉक्स तयार असून देखील मेगा ब्लॉकसाठी मंजुरी न मिळाल्याने सदर काम थांबले होते.या संदर्भात दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेख़ाली व पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीम.रेणू शर्मा, वरिष्ठ यातायात अधिकारी ओम गुप्ता,वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक सुनील मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय,पुणे येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये कुरकुंभ मोरीच्या अपुऱ्या कामाचा मुद्दा उपस्थित केला होता.
पुणे-सोलापूर रेल्वे मार्ग दौंड शहराच्या मध्यवर्ती भागातून जातो दौंड शहरातील हजारो नागरिक सध्या अस्तित्वात असणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या कुरकुंभ मोरींद्वारे प्रवास करतात परंतु त्यांच्या अरुंदपणा आणि लहान आकारामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो तर पावसाळ्यात पाणी साचल्याने वाहतूक खोळंबते हि बाब माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली व पावसाळा सुरू होण्यापूर्वी तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे तसेच दौंड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइन कनेक्शनचे कुरकुंभ मोरी लगतचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मेगा ब्लॉक साठी परवानगी मिळावी अशी मागणी केली होती.
आपल्या मागणीनुसार रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशाने मध्य रेल्वे द्वारे दौंड जंक्शन येथे तिसऱ्या विस्तारित मोरीच्या कामासाठी दिनांक १६ व १७ मे २०२२ रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे व मे अखेरीस पुशिंग बॉक्सचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे या कामासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व मनुष्यबळ देखील उपलब्ध करण्यात आले आहे.दौंड शहराच्या जिव्हाळाच्या व गेले अनेक दशक प्रलंबित प्रश्न तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामातीळ सर्वात मोठा अडथळा दूर करून दौंडवासियांना दिलासा दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आमदार राहुल कुल यांनी दौंडकरांच्या वतीने आभार मानले.