या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची बारामतीकरांची मागणी…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती शहरातील एकाला पूर्ववैमनस्यातून मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित आरोपी सुनील संभाजी माने ( रा. प्रगतीनगर,ता. बारामती,जि.पुणे ),विनोद शिवाजी माने ( रा.प्रगतीनगर, ता.बारामती,जि.पुणे ) यांच्यासह अनोळखी इसमांवर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३०७,३२३,३९४, ५०४,५०६,३८४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश बलभीम धोत्रे, वय.२७ वर्षे (रा. नेवसे रोड,नायगावकर हॉस्पिटलमागे, बारामती ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी हे पूर्वी कृष्णा जाधव यांच्या मटक्या अड्ड्यावर काम करत होते.२०१८ मध्ये जाधव यांचा खून झालेला असून,या गुन्ह्यातील संशयित आरोपी
सुनील माने व विनोद माने हे काही दिवसांपूर्वीच जामीनावर आलेले आहेत.९ तारखेला संशयित आरोपी सुनील माने याने फोन करून फिर्यादींना सातव चौकात भेटण्यासाठी बोलावून,तू गाड्यांच्या खरेदी विक्रीतून व मटक्याच्या धंद्यातुन खूप पैसे कमविले आहेत.त्यामुळे तू हफ्ता म्हणून आम्हाला दोन लाख रुपये द्यावेत. फिर्यादीची परिस्थिती गरीब असल्याने,मी पैसे देऊ शकत नाही,असे म्हटंल्यावर संशयित आरोपीने धोत्रेवर तलवारीचा वार केला असता, फिर्यादींनी तो चुकवला त्यानंतर विनोद माने यांनी त्याला काठीने मारहाण केली.
संशयित आरोपीनी फिर्यादींच्या नरड्यावर पाय देत
फिर्यादींच्या खिशातून रोख १३ हजार रुपये काढून घेतल्याचे त्याने फिर्यादीने फिर्यादीत सांगितले.फिर्यादी हा अत्यंत भयभीत झालेला असून,त्याला धीर देत ह्या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून,दोन्ही संशयित आरोपींना मा. कोर्टासमोर रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे.
या टोळीची बारामती परिसरात मोठी दहशत असल्याने यांच्या विरोधात तक्रारी देण्यास नागरिक धजावत नसून,या आरोपीवर याअगोदरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून,या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता बारामतीकरांकडून केली जात आहे.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ हे करीत आहेत.
बातमी कोट :
बारामती शहरात कोणाही गोरगरिबांवर दादागिरी किंवा दहशतीचे प्रकार करत असतील तर,त्यांची अगदी बिनधास्तपणे तक्रार करा.अशा लोकांवर गुन्हा होण्याअगोदर कारवाई केली जाईल.
सुनील महाडिक ( पोलीस निरीक्षक )