बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळेगाव येथील साखर कारखाना येथून कत्तलीसाठी आयशर गाडीत ११ बैल घेऊन जात असताना,तालुका पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून,याप्रकरणी असिफ शब्बीर मुल्ला, वय.३५वर्षे(रा.वडगाव,ता. कराड,जि.सातारा ) सचिन साळुंके( रा.पेठ,ता.वाळवा,जि.आष्टा ),शाहदाब कुरेशी ( रा. फलटण,ता.फलटण,जि.सातारा ) यांच्या तालुका पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१),(d),महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (बी),(सी), प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ चे कलम ४७,४८, ४९, ५४,५६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोरक्षक ऋषीकेश प्रभाकर देवकाते,वय.२६ वर्षे (रा.नीरावागज,ता.बारामती,जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी ऋषिकेश हे गोरक्षणाचे काम करतात,निरावागज कडून माळेगाव कॉलनीकडे जात असताना,महाराष्ट्र शासन मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी फोन करून सांगितले की,माळेगाव कारखान्यातील तुळजाभवानी चौकात काही लोकांनी जनावरे एकत्र गोळा करून एका वाहनात भरून घेऊन जाणार असल्याची माहिती मिळताच,याबाबत रात्री ८.०० च्या सुमारास पाहणी केली असता,तेथे एक आयशर कंपनीचा टेम्पो क्र.एम. एच.०९ सी.यु.८५३३ ह्या गाडीत ११ देशी जातीचे बैल दाटीवाटीने रस्सीने पाय बांधलेल्या अवस्थेत दिसून आले.
या जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा किंवा पाण्याची सोय केलेली दिसून आली नाही.याबाबत तालुका पोलिसांना कळवले असता,टेम्पोसह देशी जातीचे ११ बैल ताब्यात घेतले असून,यात २ लाख २० हजारांचा आयशर टेम्पो व ८ लाखांचे ११ बैल असा तब्बल १० लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पोलिसांनी बैल विकणारे व कत्तलीसाठी विकत घेणारे व टेम्पो मालक सचिन साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल करून सर्व बैल बारामती येथील दयोदय या गोशाळेत सुखरूप सोडले आहेत.या कारवाईत बापूराव देवकाते,रोहन बुरुंगले,विशाल देवकाते,शुभम राऊत, युवराज डाळ,हर्षद पारखे,श्रेयश शिंदे,सचिन जवळगे चेतन धाडवे या गोरक्षकांनी सहभाग घेतला.यावेळी वकील ज्ञानेश्वर माने व मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी गोरक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.या कारवाईत बारामती ग्रामीण पोलिसांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
बातमी कोट :
सचिन साळुंखे हा कसायांचा एजंट आहे.याच्यावर यापूर्वी जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केल्याप्रकरणी उंब्रज,कराड पेठ वडगाव,गांधीनगर इत्यादी पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हे नोंद आहेत.
शिवशंकर स्वामी ( महाराष्ट्र शासन मानद पशु कल्याण अधिकारी )