महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सांगली जिल्ह्यात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच बरोबर वाळू तस्करी करताना कारवाई करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या आटपाडीतील आरोपींना सहा महिने सक्तमजुरी आणि सोळाशे रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठाेठावली आहे.याप्रकरणी अक्षय दादा लव्हटे,चैतन्य उर्फ दादा लक्ष्मण भागवत,राजेंद्र उर्फ राजू मोहिते, संतोष पुजारी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सन २०१७ कालावधीत त्यांनी बोंबेवाडी ते पांढरेवाडी रस्त्यावरील कोळेकर माळ येथील ओढ्यावरील पुलाजवळ वाळू उपसा करून त्याची दोन ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून वाहतूक करीत होते.त्यावेळी तहसील कार्यालय आटपाडी येथे कार्यरत सुरेश किसन शेळके हे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेले होते.तेव्हा सर्व संशयितांनी त्यांना दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली हाेती आणि शासकीय कामात अडथळा आणला हाेता. शेळके यांनी त्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली हाेती. आटपाडी पोलिसांनी तपास करून संबंधितांबाबत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.साक्ष आणि पुराव्याच्या आधारे या चार ही संशयितांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.