इंदापुर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
ऑल इंडिया पँथर सेना पश्चिम महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे.पश्चिम महाराष्ट्रात नव्याने संघटनात्मक बांधणीचा वेग वाढला आहे.ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, पश्चिम महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष तथा इंदापूर तालुका अध्यक्ष निलेश खरात यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी, निष्ठावंत,संघटन कौशल्य असलेलं व्यक्तिमत्व आयु.उत्तम (बापू) लक्ष्मण भागवत यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे स्वागत इंदापूर तालुका उपाध्यक्ष प्रमोद भाऊ पोटफोडे,इंदापूर तालुका संपर्कप्रमुख गणेश माने, सदस्य उमेश खरात,पत्रकार सुदर्शन मखरे, सामाजिक कार्यकर्ते हितेश शिवाजी मखरे,भिमयोद्धा प्रतिष्ठान उद्धटचे अध्यक्ष नितीन साळवे,युवक कार्यकर्ते संकेत मुसळे व इतर कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. तसेच उत्तम (बापू) भागवत ह्यांच्या आजवरच्या संघर्षाला, मैदानातल्या लढयाला यश आले असून,ते सुद्धा या पदाला सुद्धा न्याय देतील अशी अशा पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.