इंदापुर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक भारतीय युवा मोर्चाचे कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील हे जंक्शन येथून जात असताना तिथे थांबून तेथिल कार्यरत असणारे पोलीस मित्र ( होमगार्ड) अमीर पवार व अजित पवार यांच्याशी त्यांनी संवाद साधला. अचानकपणे राजवर्धन पाटील यांनी गाडी थांबून आपल्याशी संवाद साधल्याने रस्त्यावर आपली सेवा बजावणाऱ्या पोलीस मित्रांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून दुपारच्या या उन्हामध्ये देखील आपल्या विभागाची सेवा हे कर्मचारी करीत होते. राजवर्धन पाटील यांनी थांबून त्यांच्याशी संवाद साधला.
या कर्मचाऱ्यांनी देखील या संवादाला प्रतिसाद देत मनमोकळा संवाद साधला.