पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ? यांच्याविरोधात आणखी एक पत्र..!!


पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून २०० कोटी रुपयांची वसुली केल्याचे पत्र काल चांगलेच व्हायरल झाले होते.त्यानंतर फक्त पोलिस दलातच नव्हे, तर शहरातही प्रचंड खळबळ उडाली.पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी हे पत्र लिहल असून,ह्या पत्रात आमदार बनसोडे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप केले असून,कृष्ण प्रकाश यांनी शहरातील विविध जमीन व्यवहारामधून मोठी माया गोळा केल्याचा गंभीर आरोप आमदार बनसोडे यांनी केला आहे.तसेच अनेक बाबींचा ह्या पत्रात उल्लेख करत कोट्यवधी रुपये जमा केल्याचा आरोप आमदार बनसोडे यांनी केलाय. हे पत्र आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिलंय.

आमदार बनसोडे यांनी काय आपल्या पत्रात काय म्हटलंय ?

पिंपरी चिंचवड शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट होता.मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन हफ्ते वसुली व वसुली रॅकेटची माहिती दिली. याची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई केली आणि कृष्ण प्रकाश यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली.सुरुवातीला अवैध धंदे बंद करुन दहशत मोडीत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.कामाबद्दल मोठा प्रचार व प्रसार करत त्यांनी जनतेची वाहवा मिळवली.अल्प कालावधीत त्यांनी जनतेची सहानुभूती मिळवली.शहरात बदल घडेल असे वाटले,पण उलटेच झाले.खोटे गुन्हे नोंदवणे, नामांकित बँकांच्या पदाधिकाऱ्यांवर एकाच वेळी अनेक गुन्हे दाखल करुन इतर पदाधिकाऱ्यांकडून मोठी रक्कम उकळणे,सामान्य जमीन मालकांच्या जमिनींवर पोलिस बळाचा वापर करुन बिल्डरांना ताबा मिळवून देणे आणि त्या बदल्यात भागीदारी घेणे,फ्लॅट घेणे,खोटे गुन्हे दाखल करणे असे अनेक कारनामे सुरु झाले.

दुसऱ्या अधिकाऱ्याने केलेली कामगिरी स्वतःच्या नावावर घेऊन स्वतःची सवंग प्रसिद्धी मिळवून सामान्य जनतेमध्ये नावलौकिक मिळवायचा.चांगल्या वित्तीय संस्थांच्या सिव्हिल मॅटरबाबत गुन्हे दाखल करुन अनेक कोटी रुपये उकळले.मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसायात सापडलेल्या मुलींचा गैरवापर झाल्याच्याही तक्रारी आपल्याकडे आल्याचे बनसोडे म्हणाले.आयुक्तांचा खरा चेहरा समाजापुढे उघड झाला पाहिजे.परंतु पोलिसांच्या दहशतीपायी नागरिक पुढे येण्यास तयार नाहीत.त्यामुळे कृष्णप्रकाशांच्या काळात नेमके काय घडलं, याचं गूढ वाढलं आहे. दरम्यान, जुन्या आयुक्तांच्या संशयास्पद कारभाराची नवे आयुक्त दखल घेणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *