महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
लातूरमध्ये एका भ्रष्ट पोलीस हवालदाराला लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.बिट अंमलदार राजेंद्र लामतुरे असं अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच नाव आहे.औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.औसा पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता.गुन्ह्यामधील त्या व्यक्तीची आरोपी म्हणून नोंद होती.मात्र आपण निर्दोष असून माझं गुन्ह्यातील नाव वगळण्यात यावं, अशी विनंती आरोपी अलीम बागवान याने केली.त्यावेळी पोलीस हवालदाराने त्याला पाच हजार रूपये मागितले. अलीम बागवानवर औसा पोलीस स्टेशनमध्ये कलम २९४,३२३, ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
हवालदार आणि अलीम बागवान यांच्यात बरीच तडजोड झाली आणि अखेर ३ हजार रूपये देण्याचं ठरलं.मात्र यानंतर अलीम बागवानने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलिसाची तक्रार केली.त्यानंतर एसीबी अधिकाऱ्यांनी तक्रारदार बागवान यांना सांगून सापळा रचला. दरम्यान,ठरवल्याप्रमाणे अलीम बागवान पैसे देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तीन हजार रूपये पोलिसाला दिले. तेवढ्यात पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली.बिट अंमलदार राजेंद्र लामतुरे यांना रंगेहाथ पकडले.