धक्कादायक बातमी : अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत, शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एकांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

कॉलेजच्या १७ वर्षीय अल्पवयीन युवतीला फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल करत शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून,याप्रकरणी संशयित आरोपी प्रद्युमन हरिश्चंद्र शिंदे( रा.कुंजीरवाडा,ता.हवेली, जि.पुणे ) याच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३५४ (अ),(ड),३८५, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,१७ वर्षीय युवतीला वेळोवेळी फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल करत,शरीरसुखाची व पैशांची मागणी केल्याची घटना घडली असून,आरोपीने ऑक्टोबर २०२१ पासून ते ३ मे २०२२ पर्यंत पीडित युवती ही अल्पवयीन असताना, तसेच तिची इच्छा नसतानाही वारंवार फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल करत लैंगिक सुखाची मागणी केली, तसेच आरोपीने आई आजारी असल्याचे कारण सांगत मला पैसे न दिल्यास माझ्याकडे असलेले फोटो घरच्यांना दाखवण्याची भीती घालत जवळपास रोख रक्कम १ लाख ८५ हजार आणि दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण खंडणीपोटी देण्यास भाग पाडले.असे पीडित फिर्यादीने फिर्यादीत म्हंटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *