Big News : बारामतीचे प्रांताधिकारी दोन टक्के कमिशन घेतात.. भर सभेत शेतक-याची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत.पवार यांच्या काटेवाडी गावात एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान एका ग्रामस्थाने संत तुकाराम महाराज पालखी मार्गात घर गेलेय पण त्याचा मोबदला मिळत नसल्याची तक्रार केली.त्यावर तोडगा काढण्यासाठी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना अजित पवार सुचना देत होते.

याच दरम्यान, सभेत उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने पालखी मार्गाची नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे दोन टक्के कमिशन घेत असल्याची तक्रार केली. भर सभेत असा आरोप झाल्याने उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण झाले. त्यावर अजित पवार यांनी मात्र, कपाळाला हात लावत आश्चर्य व्यक्त केले. पण त्याचवेळी स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील यांना संबंधित शेतक-याची तक्रार दूर करण्याची सुचना केली.तसेच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अनेक शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये खाल्ले असल्याचा गंभीर आरोप देखील या शेतकऱ्याने केला आहे.त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार याकडे गांभीर्याने लक्ष देणार का ? या प्रकरणाची चौकशी होणार का ? असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थितीत केला जात आहे.

अजित पवार आडवा आला तरी उचला;डिवाएसपींना भर सभेत सुचना..

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत.पवार यांच्या काटेवाडी गावात एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान लोकांनी विविध समस्या सांगायला सुरुवात केली आणि अजित दादांनी तिथेच जनता दरबार सुरू केला. या कार्यक्रमात अजित पवार यांची तुफान फटकेबाजी पहायला मिळाली.कार्यक्रमात एका नागरिकाने जागेची मोजणी म्हणून सुरू असलेल्या वादाची तक्रार मांडली.

दोन गटात वाद असल्याने समोरचा व्यक्ती ऐकत नाही असे सांगितल्यावर मात्र अजित दादा काही संतापले आणि त्यांनी थेट उपस्थित असलेल्या डिवाएसपींना आदेश दिला. यांची एकत्र बैठक घेऊन वेळ बसतोय का पहा. या प्रकरणात अजित पवार आडवा आला तरी त्याला उचला असं म्हणत पवारांनी त्यावर तोडगा काढला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *