Crime News : सासरच्या मंडळींकडून पैशासाठी छळ ; नवऱ्यासह सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

लग्नानंतर वारंवार आर्थिक मदत करूनही हॉटेल व्यवसायासाठी वीस लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी संशयित आरोपी नवरा अभिषेक अरुणकुमार निधान,सासरे अरुणकुमार सोनपाल निधान,सासू राजश्री अरुणकुमार निधान,नणंद ज्योती आकाश मलब,आकाश मलब (रा.संत ज्ञानेश्वरनगर, वागळे इस्टेट,ठाणे ) यांच्यावर भा.द.वि कलम ३२३, ४९८(अ), ५०४,५०६,३४ नुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दौंड येथे राहणाऱ्या गायत्री अभिषेक निधान यांनी सासरच्या लोकांविरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती अशी की डिसेंबर २०२० रोजी फिर्यादींचा विवाह आरोपी अभिषेक याच्याशी झाला.लग्नात ठरल्याप्रमाणे सासरच्यांचा सर्व मानपान देण्यात आला.लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी पती फिट येऊन पडला,त्याला दोन दिवस बोलताही येत नव्हते.हे पाहून फिर्यादींनी मला पतीच्या आजाराबाबत का सांगितले नाही म्हणून सासरच्या लोकांना विचारणा केली असता,पतीने फिर्यादी यांना मारहाण केली.त्या दिवसापासूनच फिर्यादीचा छळ सुरू झाला.ननंद व घर जावई हेसुद्धा फिर्यादी यांना तू जाडी आहेस असे टोचून बोलू लागले.
वारंवार रात्री-अपरात्री घरातून बाहेर काढू लागले.त्यामुळे फिर्यादींच्या वडिलांनी जावयाला डेअरी व्यवसायासाठी दोन लाख रुपयांची मदत केली होती,परंतु व्यवसाय बुडल्याने याबाबत फिर्यादींनी विचारणा केली असता पुन्हा त्यांना मारहाण करण्यात आली.

त्यामुळे फिर्यादींना आई वडील पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांनी घडलेला सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. आरोपींनी फिर्यादींच्या आई वडिलांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न देखील केला. त्यावेळी फिर्यादींना आई वडील माहेरी दौंड येथे घेऊन आले.काही दिवस माहेरी राहिल्यानंतर फिर्यादींच्या वडिलांनी त्यांना सासरी सोडून आले,परंतु सासरच्या लोकांकडून होणारा वारंवारचा छळ काही बंद झाला नाही.त्यानंतर सासरच्या लोकांनी हॉटेल व्यवसायासाठी तब्बल वीस लाख रुपये द्या,अशी मागणी केली असता,फिर्यादीच्या वडिलांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता,त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे फिर्यादी पुन्हा माहेरी निघून येत त्यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *