Baramati Big Breaking : पत्नीशी अनैसर्गिक संबध ठेवत तिचा छळ करणाऱ्या बारामतीमधील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पत्नीशी अनैसर्गिक संबध ठेवत तिचा शारीरिक छळ व फसवणूक करणाऱ्या बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार संशयित आरोपी अकबर कादिर शेख,वय.३२ वर्षे ( रा.हार्दीक वंदना, अपार्टमेंट,खंडोबानगर, बारामती,जि.पुणे ) याच्यावर भा.द.वि कलम ४९८(a),५०४, ५०६,३७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडित पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,बारामती शहर पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत असलेल्या संशयित आरोपीचे फिर्यादी यांच्याबरोबर ३१ मार्च २०१८ रोजी आळंदी येथील श्रीकृष्णा कार्यालयात झाला होता.पीडित फिर्यादी यांच्या बरोबर संशयित आरोपीने आंतर जातीय विवाह केला असून,त्यांना दोन वर्षांचा मुलगा देखील आहे.
आंतरजातीय विवाह झाल्याने शेख हे फिर्यादीचा गैरफायदा घेत होते.पोलीस कर्मचारी असल्याने ते वारंवार फिर्यादींचा शारीरिक व मानसिक छळ करत होते.त्यामुळे गेल्या महिन्यापासून फिर्यादी ह्या जिवाच्या भीतीने माहेरी निघून गेल्या होत्या.

त्यांनी अनेक वेळा फोन करत मला घेऊन जा,तेव्हा संशयित आरोपी शेख याने मला तुझी गरज नाही त्यामुळे मला तु फोन करु नकोस जर परत फोन केला तर तुला ठार मारुन टाकील.त्यांच्यामुळे फिर्यादींच्या व तिच्या वडिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच लग्न झाल्यापासुन बारामती येथे राहत असल्याने शेख याने कधीही फिर्यादींना आपल्या घरी नेले नाही. त्याबाबत काही विषय काढला तर ते फिर्यादींना मारहाण करायचे प्रेम विवाह करूनही शेख याने कोणतीही माहीती घरी व नोकरीच्या ठिकाणी कळवली नाही.

तसेच फिर्यादींच्या मनाविरुद्ध शाररीक सबंध ठेवुन धमकावत,माझा उपभोग घेतला चारीत्र्याचा खेळ करत वारंवार जातीवाचक शिवीगाळ करत, पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे.माझे कोण वाकडे करु शक्त नाही तसेच आरोपीला कायद्याची भिती वाटत नाही.फिर्यादींची नांदण्याची ईच्छा असून,मुलाच्या माझ्या भवितव्याचा प्रश्न असून,सर्व प्रकरणाची गंभीरता पुर्वक दखल घ्यावी. असे फिर्यादींनी फिर्यादीत महंटले आहे.याबाबत अधिक तपास बारामती शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *