मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज ठाकरे हे समाजात दुही निर्माण करत असून त्यांच्यावर राजद्रोहाचे कलम लावण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च यायालयात माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील आणि वकिल आर.एन.कचवे यांनी दाखल केली आहे.
‘मशिदींवरील भोंगे उतरले नाही तर त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा,असे आवाहन नागरिकांना करून दोन समाजांत दुही निर्माण करणे, चिथावणी देणारी भाषणे करणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे यामुळे राज ठाकरे विरोधात भारतीय दंड संहितेचे १२४-अ (राजद्रोह) हे कठोर कलम लावण्याचा आदेश पोलिसांना द्यावेत’,अशा विनंतीची जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली.