मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक दिवस रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी आता माजी आमदार विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी आज ही घोषणा केली आहे. याशिवाय राज्यात पहिल्यांदाच महिला आघाडीच्या विभागवार अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण म्हणाल्या,रुपाली चाकणकर यांच्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पद रिक्त होते,यावर आता माझी निवड झाली आहे. देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना सर्व महिलांना सोबत घेवून यावर आम्ही सातत्याने आवाज उठवणार असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.