बारामती तालुका पोलिसांची कारवाई..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
फायनान्सकडून कर्जप्रकरणे करण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करत,पुण्याच्या लिक्विलोन फायनान्स व बारामतीच्या चंदूकाका सराफ दुकानाची फसवणूक केल्याप्रकरणी ११ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२०,४६५,४६७,४६८, ४७१,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी संशयित आरोपी सोहेल शेख,पूर्ण नाव माहीत नाही,(रा. वालचंदनगर,जंक्शन,शेखवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे) असिफ सय्यद (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अभिजित रामनाथ शेळके (रा. बेलवाडी,ता.इंदापूर ) बाळू सोनबा वाघमोडे (रा. हनुमंतवाडी,ता.इंदापुर,जि.पुणे ),बाबा मोहन गायकवाड ( रा.चिखली,ता. इंदापुर,जि.पुणे) अक्षय बापू मोहिते (रा.शेळगाव ता. इंदापुर जि.पुणे) धूळा पांडुरंग शेंडगे (रा.एकशिव,ता.माळशिरस,जि. सोलापूर ) बाळासो राजाराम पवार ( रा.इंदापूर रोड, बारामती ) नितीन बबन पवार (रा.माळेगाव,ता. बारामती जि.पुणे) ओंकार हनुमंत शिंदे (रा.तांदूळवाडी,ता. बारामती,जि.पुणे ) सोहम ( पूर्ण नाव,पत्ता माहीत नाही ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी लिक्विलोन फायनान्स कर्मचारी अनुराग महेंद्र अरोरा, वय ३१ वर्षे ( रा.एमनोरा पार्क,टॉऊन हडपसर,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी हे सन २०१८ पासुन लिक्विलोन फायनान्सचे काम करत असून,यासाठी बारामती येथील चंदुकाका सराफ पेन्सिल चौक यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांचे कर्ज प्रकरण घ्यायचे. यासाठी सोन कर्ज प्रकरणासाठी कर्जदारांकडून पॅन कार्ड,आधारकार्ड,पगार स्लीप,बँक स्टेटमेंट,इन्कमटॅक्स रिटर्न फाईल अशी
कागदपत्रे कर्जप्रकरण करण्यासाठी चंदुकाका सराफ यांच्या मार्फत घेतली जायची.चंदुकाका सराफ यांच्या दुकानातून अभिजीत शेळके याने तब्बल ६,५०००० रुपयांचे,बाळु वाघमोडे यांनी १०,००,००० रुपयांचे,बाबा गायकवाड ६,००,००० रुपयांचे,अक्षय मोहिते यांनी ७,५०,००० रुपयांचे धुळा शेंडगे यांनी ४,००,००० लाखांचे,नितीन पवार यांनी ५,००,००० लाखांचे अशी ७ कर्जप्रकरणे येऊन त्यांची पात्रता पाहून लिक्विलोन फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी सीबील चेक करून
या रक्कमेचे चंदुकाका सराफ या दुकानातुन सोन्याचे दागिने दिले.
त्यानंतर देखील आणखी सात कर्जप्रकरणे चंदुकाका सराफ यांच्या दुकानाकडे आली असता, त्यानुसार या प्रकरणाची कागदपत्रे चेक करीत असताना, संशयित आरोपींनी अगोदर मंजुर केले कर्ज प्रकरणामधील बँक स्टेटमेंट व आय.टी.आर हे एकच असल्याचे दिसुन आल्याने,यापूर्वी मंजुर केलेल्या प्रकरणाची पडताळणी केली असता,त्यामध्ये बँक स्टेटमेंट व आय. टी.आर हे थोडाफार बदल करुन सर्व स्टेटमेंट सारखेच असल्याचे दिसुन आले.त्यानंतर फिर्यादींनी चंदुकाका सराफ यांच्या दुकानातील मॅनेजर शुकलेश्वर जगताप यांना फोन करुन सदर कर्ज प्रकरणे बोगस खोटी असल्याची माहिती देत, आरोपींना कॉल करून काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कॉल केले असता काहींनी कॉल उचलले नाहीत व काहींनी आम्ही बाहेर गावी असल्याने येऊ शकत नाही असे म्हणत टाळाटाळ केली आहे.
यातील आरोपी सोहेल शेख,असिफ सय्यद ,ओंकार शिंदे, सोहोम हे वेळोवेळी दुकानात येत होते.या लोंकानी संगनमताने कर्जदारांसोबत येत स्वतःच्या बँक अकाउंट ची खोटी स्टेटमेंट देत फिर्यादींची आणि चंदुकाका सराफ यांची तब्बल ४५ लाखांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादींनी फिर्यादीत महंटले आहे.या फसवणूक प्रकणातून आणखीच नवे गुन्हे उघडकीस येण्याची लोकांकडून शक्यता वर्तवली जात आहे.आणि यातच या टोळीचे महापराक्रम देखील उघडकीस येण्याची चर्चा देखील जोरदार सुरू आहे.