तर भाजपचा देखील हनुमान चालीसेला अप्रत्यक्षपणे पाठिंबाच.
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार बारामतीत देखील मनसैनिकांकडून ७ च्या सुमारास मारुती पाणवठा वेस मंदिरात आरती करत हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली होती.मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाने आपण दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून हा कार्यक्रम आयोजित केला होता,त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडल्याचा प्रश्नच उदभवला नाही.
बारामती शहरातील रस्त्यावर असलेल्या मारुती मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, आज पहाटे मशिदीवरील भोंग्याचा आवाज आला नाही, असा दावाही मनसैनिकांनी केला असुन, यावेळी कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मनसैनिकांना नोटीसा बजावल्या होत्या मशिदींच्या ठिकाणी आणि मारुती मंदिराजवळ पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर,मनसेचे तालुकाध्यक्ष ऍड.निलेश वाबळे, ऍड.भार्गव पाटसकर,ऍड विनोद जावळे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते, शहराध्यक्ष सतीश फाळके,निलेश धालपे,विकी आगम व इतर मनसैनिक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.