Daund News : आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश ; दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या तब्बल ३३ कोटी ५० लाखांच्या कामाला अखेर सुरुवात..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दौंड तालुक्यातील गोर गरिब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, वैद्यकीय चाचण्या माफक दरात उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून २०१८ साली दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे ५० खाटा वरून १०० खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन व विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे ३३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधीस आपण मान्यता मिळविली होती.

दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे बांधकामास सुरुवात झाली असून हे काम वेगाने प्रगतीपथावर आहे तसेच कोव्हीड – १९ कालावधीत रुग्णांना ऑक्सिजन पुरवठामध्ये आलेली आव्हाने लक्षात घेता दौंड उपजिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकल ग्रेड ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव व जिल्हाधिकारी राजेश देशमुख , पुणे यांचेकडे केली होती त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे सुमारे ४१ लक्ष रुपये खर्चाची ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आलेली आहे.

नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियांता हरिश्चंद्र माळशिकारे,उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक संग्राम डांगे यांच्या समवेत दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीच्या कामाची व ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्रणेची पाहणी केली यावेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया व दौंड शहरातील सहकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *