बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदीवरील भोंग्याचा आवाज आल्यास समोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांनी केलं होतं. मुस्लिम बांधवांकडून पहाटेची अजाण केली जाते आज बारामतीत अनेक ठिकाणी असलेल्या मशिदीतून नमाज पठण करताना कुठूनही भोंग्याचा आवाज आला नाही भोंग्याविना नमाज पठण करण्यात आले आहेत.बारामती पोलिसांकडून शहरात आणि ग्रामीण भागात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मशीद आणि हनुमान मंदिराबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
बातमी कोट :
सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत काही मशिदींनी आणि मंदिरांनी हे लाऊड स्पिकर परवाने घेतलेले आहेत आणि ते परवाने सुद्धा डेसीबल मीटर पेक्षा आवाज जास्त होणार नाही याप्रमाणे दिलेले आहेत.आणि नियमात राहून सर्व हिंदू मुस्लीम हे नियमांचं पालन करीत आहेत. आणि याप्रकारे कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. आणि शहर पोलिसांनी शहरात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही.या दृष्टीने पोलीस तैनात करून दक्षता घेतली आहे.
सुनील महाडिक ( बारामती शहर पोलीस निरीक्षक )