महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
एखाद्या पशूलाही लाजवेल आणि आई आणि मुलाच्या नात्याला कलंक फासणारी घटना बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे ५ जून २०२१ रोजी घडली होती.रात्री अकराचे सुमारास आरोपी किशोर खंदारे,वय. ४५ वर्षे हा मद्यपान करून घरी आला.त्याची पत्नी माहेरी गेली होती.आणि वृद्ध आई घरात एकटीच होती.किशोर याने त्या रात्री झोपेत असलेल्या आपल्या आईवर तीनवेळा बलात्कार केला. ही घृणास्पद व संतापजनक घटना पीडित मातेने सकाळी आपली मुलगी व चुलत सुनेला सांगीतली.
नातेवाईकांना सोबत घेऊन रायपूर पोलीस ठाण्यात नराधम पुत्राविरूद्ध बलात्काराची तक्रार दिली होती.पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. एन. मेहेरे यांचे न्यायालयात सुनावणी होऊन आठ साक्षी नोंदण्यात आल्या.आरोपी किशोर खंडारे याने त्याचे वृद्ध आईवर बलात्कार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला आजीवन सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.सहायक सरकारी वकील एस. पी.हिवाळे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.