इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भाजपा हा जनहिताची कामे करणारा व तळागाळापर्यंत पोचलेला देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. इंदापूर तालुक्यातील भाजप घराघरात पोहोचला आहे. आगामी काळात भाजपचा कार्यकर्ता जनहितासाठी आक्रमकपणे काम करेल,असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना शनिवारी ( दि.३०) केले.ते पुढे म्हणाले,भाजपा हा देशात व राज्यातील नंबर वन पक्ष आहे.पुणे जिल्ह्यातील हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला असून, आगामी निवडणुकीत भाजप आपली ताकद दाखवून देईल.
देशातील सर्व समाजाला बरोबर घेऊन जनहितासाठी पक्षाचे कार्यकर्ते झोकून देऊन काम करीत आहेत. शेतकरी, मागासवर्गीय,समाजातील उपेक्षित घटक, महिला, युवक वर्ग यांच्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली सरकार अनेक योजना यशस्वीपणे राबवित आहे.कोरोना काळापासून २ वर्षे झाले भाजप नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशातील ८२ कोटी जनतेला प्रति महिन्याला मोफत अन्नधान्य पुरवठा करीत आहे,ही बाब जनता कधीही विसरणार नाही.पंतप्रधान सन्मान योजनेतुन शेतकऱ्यांना दोन हजारांची मदत दिली जात आहे.केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचेमुळे देशातील व राज्यातील सहकाराला मोठे पाठबळ प्राप्त झाले आहे,त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भाजप अतीशय मजबुतीने वाटचाल करीत आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वीज भारनियमन व इतर चुकीच्या धोरणा विरोधात तसेच पक्षवाढीसाठी भाजपा कार्यकर्ता आक्रमकपणे काम करेल, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.याप्रसंगी महाराष्ट्र किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे,पुणे जिल्ह्यात भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे,जालिंदर कामठे,अविनाश मोटे, तालुकाध्यक्ष अँड,शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी इंदापूर अर्बन बँकेच्या सभागृहात इंदापूर तालुका भाजपची ६१ पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी,७ मोर्चे व २२ आघाड्यांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक भाजप नेते हर्षवर्धन पाटील व मान्यवर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली.
बातमी चौकट :
येत्या काही दिवसात तातडीने प्रत्येक मोर्चा व आघाडीनिहाय स्वतंत्रपणे बैठका घेऊन कार्यकर्त्यांना नेमणूक पत्रे देण्यात येतील,असे यावेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.