बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती- इंदापूर रोडने शहर पोलीस कर्मचारी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना पिंपळी हद्दीत असणाऱ्या मॅकडॉल कंपनीसमोर असणाऱ्या कॅनॉलवर एकाला ताब्यात घेत, त्याच्याकडून सात हजार दोनशे रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा जप्त करण्यात आला असून,संशयित आरोपी किशोर जितेंद्र धोत्रे,वय. २३ वर्षे, (रा.धोत्रेवस्ती,कन्हेरी,ता.बारामती,जि पुणे ) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३२८, २७२,१८८, अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ चे कलम २६ (२),(iv), २७,३० (२) (i) तसेच ३१ (१) (z), ५९ (i) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी शहर पोलीस कर्मचारी बंडू मच्छिंद्र कोठे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,बारामती-इंदापूर रोडवरून पेट्रोलिंग करत असताना,पिंपळी हद्दीत असणाऱ्या मॅकडॉल कंपनी समोर असणाऱ्या कॅनॉलजवळ संशयित आरोपी किशोर धोत्रे हा ऍक्टिव्ह गाडीवर थांबलेला दिसला.त्याच्या गाडीच्या मधल्या भागात फुट रेस्टच्या ठिकाणी एक पोते ठेवलेले दिसल्याने त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता,त्याच्या अक्टिव्हा गाडीवर असलेल्या पोत्यामध्ये काय आहे असे विचारले असता त्याने पोत्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा असल्याचे सांगितले त्या गुटख्याची विक्री तो स्वतःकरीत असल्याचे सांगितले.त्यानंतर पोलीस नाईक खांडेकर यांनी पोत्याची पाहणी केली असता,त्यात गुरखा मिळून आला. तसेच आरोपीची अंगझडती घेत अक्टिव्हा गाडी क्र.MH.42 AZ 4536 ही गाडी सत्तर हजार किमतींची,त्याच्याकडे रोख रक्कम ७३० रुपये,७७२६ रुपयांचा गुटखा असा एकूण ७७,९५६ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.असे फिर्यादींने फिर्यादीत महंटले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बंडू कोठे,कल्याण खांडेकर,दशरथ कोळेकर,तुषार चव्हाण यांच्या पथकाने केलेली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत.