बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्ज व मालोजीराजे सहकारी बँकेच्या कर्जाचा बोजा असतानाही,बोजा नसलेली बनावट व खोटे कागदपत्रे सादर करत खरेदीखत करून एकाची फसवणूक करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नितीन मारुती काळे ( रा.सणसर,ता.इंदापूर,जि. पुणे ) व सुनील दत्तात्रय मदने ( रा.काटी,ता.इंदापूर,जि. पुणे ) यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२०, ४०६,४६७,४६८,४७१,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी तुळशीराम नारायण शिंदे,वय.५२ वर्षे (रा.काझड,ता.इंदापुर,जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्यादी शिंदे यांच्याकडे २०१४-१७ या कालावधीत जैन पाईप कंपनीची डिलरशिप होती.तसेच त्यांचा शिदे इंजीनिअर्स अन्डँ कन्सलंटट या नावाने व्यवसाय देखील सुरू होता.व्यवसायासाठी फिर्यादींनी
काळे प्रेस्टिज या इमारतीमध्ये गाळे विकत घेण्याचे ठरवत,चौकशीसाठी गेले असता,बिल्डिंगचे मालक संशयित आरोपी नितीन काळे यांनी शहरातील गट क्र. ६/३/ड मधील काळे प्रेस्टीज मधील गाळा क्र.१५ व १६ शिंदे यांनी पंसत पडल्याने गाळा क्र.१५ हा ६९ लाख ०८ हजारांना व गाळा क्र.१६ हा ६८ लाख १० हजार ५४५ असे दोन्ही मिळून तब्बल १ कोटी ३७ लाख १८ हजार ५४५ रुपयांना २०१५ साली दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदीखत करण्यात आले.
काही दिवसानंतर शिंदेंना आर्थिक गरज भासू लागल्याने त्यांनी दोन्ही गाळे पंजाब नॅशनल बँक बारामती यांच्याकडे गहाण ठेवत ८० लाखांचे कर्ज घेतले.पुढे व्यवसायात आर्थिक अडचणी आल्याने,व्यवसाय पूर्णपणे डबघाईस गेला,त्यामूळे बँकेच्या कर्जाचे हफ्ते थकीत राहत गेले.त्यामुळे शिंदेंनी दोन्ही गाळे विक्रीसाठी काढले असता,सचिन मधूकर सातव हे गाळा घेण्यास तयार झाले,त्यानुसार दोन्ही गाळ्यांचे साठेखत करण्यात आले. त्यांनतर नितीन काळे व सूनिल मदने हे फिर्यादीना भेटत तुम्ही दुसऱ्यांना गाळे विकण्यापेक्षा आम्ही दोन्ही गाळे जास्त किंमतीने विकत घेतो असे म्हणत जास्त पैस्यांचे अमिश दाखवले.ही गोष्ट शिंदेनी सचिन सातव यांना सांगत,केलेले साठेखत रद्द करण्यात आले.
त्यानंतर काळे यांनी मदने यांच्या नावावर दोन्ही गाळ्यांचे दस्त करून दिले.खरेदी दस्ताप्रमाणे पंजाब नशनल बकेचे व्याजासह संपूर्ण कर्जाची परतफेड करतो असा
भरवसा काळे व मदने शिंदेना दिला.पंजाब नॅशनल बँकेच्या कर्जाचे ८५ लाख व व्याज व काळे प्रेस्टीज या इमारतीमधील बेसमेंटचा गाळा क्र.०२ आणि मोबदला रक्कम ६५ लाख ठरवून दोन्ही गाळ्याच्या मोबदल्यात खरेदी करून देत,या गाळयावर पूर्वीचे कोणतेही कर्ज
नसल्याचा भरवसा आरोपींनी फिर्यादींनी दिला.मात्र सचिन सातवांनी दिलेली विसार रक्कम देता येत नसल्याने,त्यांना गाळा क्र.२ हा ६५ लाखांना खरेदी दिला.मात्र पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज परतफेडीसाठी काळे व मदने यांच्याकडे चकरा मारल्या असता,आज भरू उद्या भरू असे करत तब्बल सात महिने या गोष्टीला घालवले.त्यानंतर काही कारणास्तव फिर्यादींवर गुन्हा दाखल झाल्याने जवळपास दोन अडीच वर्षानंतर फिर्यादी जामीनावर सुटल्यावर काळे व मदने यांच्याकडे गेले असता,तू आरोपी आहेस,त्यामूळे तूला आता आम्ही मारून टाकले तरी कोणी आमचे काही वाकडे करू शकनार नाही तेव्ह तू आमचेकडे यायचे बंद कर नाहीतर आम्ही तूला संपवून टाकू अशी वारंवार धमकी देत फिर्यादींना शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपींनी दोन्ही गाळ्याच्या मोबदल्यात दिलेल्या गाळयावर बँकेच्या कर्जाचा बोजा असल्याचे सातव यांच्या निदर्शनास आल्याने सातव यांनी मला माझे पैसे दया व मला तूमचा गाळा नको या गाळयावर पूर्वीच मदने यांनी कर्ज काढले आहे.अशी त्याची कागदपत्रे दाखवली.यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे ५ कोटी आणि मालोजीराजे सहकारी बँकेचे २० लाखांचे कर्ज असताना,कर्जाचा बोजा असताना, खोटे व बनावट उतारे जोडत खरेदीखते करून दिल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आल्याने बोजा नसल्याची बनावट कागदपत्रे बनवत माझी तब्बल १ कोटी ३७ लाख १८ हजार ५४५ रुपयांची फसवणूक केलेली आहे.असे फिर्यादीने फिर्यादीत म्हणंटले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.