Baramati News : झारगडवाडी विविध विकास सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र बोरकर यांची बिनविरोध निवड..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

झारगडवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक ही महिन्यांपूर्वी बिनविरोध झाली आहे.ही संस्था १९११ साली स्थापन झाली असून, वडील धाऱ्यानीं लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.या संस्थेची निवडणूक लागू नये म्हणून गावातील पुढाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करत एकोप्याचे दर्शन घडवले होते.आणि आता चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध करत एकोप्याचे दर्शन घडवले आहे.चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची साधक बाधक चर्चा करून निवडणुक न लावता एकमताने चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदे एकमताने निवडण्यात आली.

बारामती प्रशासकीय भवनात असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयात येत चेअरमनपदी राजेंद्र बोरकर यांची तर व्हॉइस चेअरमनपदी भिवाजी बनकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टंकसाळे व सहाय्यक अधिकारी अमर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी मावळते चेअरमन प्रकाश बोरकर,छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, धुळाबापू बोरकर,दिलीप झारगड, प्रवीण बोरकर,नितीन शेडगे, रमेश बोरकर,संतोष मासाळ,बाळासो निकम,मारुतराव साळुंके,सचिव अंकुश बोरकर,दादासो बोरकर व सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थितीत होते.

बातमी कोट :

देश स्वतंत्र होण्यापूर्वी वडीलधाऱ्यांनी रोपटे लावून स्थापन केलेली झारगडवाडी विविध कार्यकारी विकास सोसायटीचा वटवृक्ष झाला आहे. या संस्थेची स्थापना १९११ साली झालेली आहे.सध्या या संस्थेची स्वतः च्या मालकीची लाखो रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. भविष्यात सर्व संचालक मंडळ आणि सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेसाठी भव्य प्रकल्प उभारण्याचा मानस आहे.ही संस्था आर्थिकदृष्ट्या तालुक्यात १ नंबर आणण्याचा माझा मानस असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.

राजेंद्र बोरकर ( नवनिर्वाचित चेअरमन )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *