Baramati Crime : बारामती शहर पोलिसांचा अवैध गावठी दारू हातभट्टीच्या धंद्यावर छापा ; कारवाईत मुद्देमाल केला हस्तगत..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

गावठी हातभट्टी दारू भट्ट्यावर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिले असताना, मॅक डोनाल्ड कंपनीच्या पाठीमागे नीरा कॅनॉल जवळ सुरू असलेल्या हातभट्टीवर रेड करत संशयित आरोपी अलका शशिकांत उर्फ सेशल्या पवार ( रा.इंदिरानगर, झोपडपट्टी,कंपनी शेजारी पिंपळी ) तसेच बांदलवाडी गावात संशयित महिला आरोपी मंगल गणेश गंगावणे या महिलेच्या हातभट्टी वर छापा टाकत ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी तुषार दत्तात्रय चव्हाण यांनी फिर्याद दिली असून,आरोपींवर भा.द.वि १८६० चे कलम ३२८, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (e), ६५ (f) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार,गुणवडी गावच्या हद्दीत बांदलवाडी येथे मंगल सोनवणे ह्या आपल्या राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत गावठी हातभट्टीची दारू तयार करताना मिळून आली.सदर महिलेला पोलिसांची चाहूल लागताच महिलेने त्याठिकानाहून पळ काढला. त्याठिकाणी कच्चे रसायन,जळके रसायन,गावठी हातभट्टीची तयार दारु,चाटू, ग्लास असे एकूण ७१२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तसेच पोलिसांनी मॅकडोनाल्ड कंपनीच्या पाठीमागे नीरा कॅनल जवळ पिंपळी गावाच्या संशयित आरोपी अलका शशिकांत उर्फ सेशाल्या पवार हिच्या हातभट्टी वर रेड केली असता, त्याठिकाणी ८०० लिटरचे बेरेल रसायन नाश करून तोडून टाकलेली आहेत.

या कारवाईत १६ हजारांचा मुद्देमाल नाश केलेला आहे.तसेच गुणवडी गावच्या हद्दीत बांदलवाडी या ठिकाणी गंगावणे यांच्या दारू भट्टीवर रेड करत,त्या ठिकाणावरून ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून चारशे लिटर रसायनाचे दोन बॅरल फोडण्यात आले.त्याठिकाणी ७१२५ रुपयांचा गावठी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद माहिते, बारामती उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपनिरीक्षक घोडके निंबाळकर तसेच तपासी पथकाचे कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, सहाय्यक पोलीस फौजदार काळे यांनी केलेले आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *