बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
विमानाचे अपहरण करण्याच्या अनेक घटना समोर आल्या असून,विमान अपहरण कर्त्यांकडून मोठी वित्त व प्राणहानी घडवून आणली जाऊ शकते.अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व एखादया विमानतळावरुन विमानाचे अपहरण झाले तर कोणत्या प्रकारच्या उपययोजना केल्या पाहिजे याचे प्रात्यक्षिक आज (दि.२९) एप्रिल रोजी बारामती एमआयडीसी येथील विमानतळावर करण्यात आली.
उपाययोजनांची रंगीत तालीम घेवून यावेळी विमान कशाप्रकारे संपर्कात येवू शकते.अचानकपणे विमानाचे अपहरण कशाप्रकारे होते व अपहरणाचे कोडवर्ड याबाबतची माहिती या प्रात्यक्षिकातून देण्यात आली. प्रात्यक्षिकाच्या वेळी धावपट्टीवर अॅम्बुलंस,अग्निशामक वाहन, श्वानपथक,पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यांनी सहभाग घेतला.यावेळी कंट्रोल रुममधून प्रात्यक्षिकाची पाहणी उपस्थितांनी केली.
यावेळी बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस बारामती विभागाचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील,वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंदारे ,तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण व इतर पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.