मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राजकारणात नेमकं चाललंय तरी काय हे मात्र कळायला तयार नाही.काही दिवसांपासून राजकिय नेत्यांवर बलात्कारांचे आरोप,गुन्हे दाखल होण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.सुरुवातीला राष्ट्रवादीचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा ( मुंडे ) यांनी देखील अशाच प्रकारे आरोप केला होता, त्यानंतर शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर देखील एका पीडित युवतीने बलात्कार करत आपला गर्भपात केल्याचा आरोप करत,गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तदनंतर भाजपचे नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक यांच्यावर देखील एका महिलेने बलात्काराचा आरोप करत गणेश नाईक आपल्याला व त्यांच्यापासून झालेल्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे राजकारणातील हे मोजकेच नेते लिंगपिसाट तर झाले नाही ना ? लोकांनी आपल्याला कशासाठी निवडून दिले आहे याचं भान त्यांनी राहील नाही का ? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थितीत केला जातो आहे.त्यामुळे आता अशा नेत्यांना जनता परतीचा रस्ता दाखवणार हे येत्या काळातचं पाहायला मिळेल.
आता पुन्हा नव्याने शिवसेनेच्या मुंबईतील एका खासदारावर महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.या प्रकरणात पीडित महिलेने लेखी तक्रार दाखल केली आहे.मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे.शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.
या प्रकरणात साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देण्यात आली आहे.मात्र,अद्याप या संदर्भात पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाहीये.पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हा आरोप करण्यात आला असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.माझ्या विरोधात लेखी तक्रार एका महिलेने दिली आहे.ही तक्रार संपूर्णपणे निराधार असल्याचं म्हणत हे आरोप फेटाळून लावले.