बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामतीमधील नामांकित शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखवत महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून,याप्रकरणी वरिष्ठ सहाय्यक दादासो दशरथ काळे ( रा.निरावागज,ता.बारामती,जि.पुणे ) याला बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी २२ वर्षीय पीडितीने फिर्याद दिली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,बारामतीमधील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक दादासो काळे याच्याकडे पीडित महिलेने नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. नोकरीच्या अनुषंगाने काळे हे पीडितेला वेळोवेळी फोन करू लागले.तसेच नोकरीच्या अनुषंगाने मोबाईल चॅटिंग केले.(दि.२४) रोजी सायंकाळी आमराई येथे बोलावत पीडितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून,माझ्याबरोबर येण्यास वेळ आहे का ?
मी तुम्हाला फलटणला सोडायला येवू का ? जाताना आपण लवकर निघू आणि वाटेत कोठेतरी हॉटेल किंवा शेतीचे ठिकाण बघून थांबू असे म्हणत पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादींनी फिर्यादीत महंटले आहे.शहर पोलिसांनी संशयित आरोपी काळेला तात्काळ ताब्यात घेतले असून,पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकपाळ हे करीत आहेत.