सासवड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी मंगल बजरंग नानावत ( रा. वढू बुद्रुक,ता.शिरूर,जि. पुणे ) याला ताब्यात घेतले आहे.तपासादरम्यान आरोपीकडून जबरी चार चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सासवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तपास करीत असताना,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी धीरज जाधव यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की,या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी मंगल नानावत हा रांजणगाव येथे येणार असल्याचे समजल्याने,स्थानिक गुन्हे शाखेने त्याठिकाणी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले.आरोपीकडे अधिक चौकशी केली असता,आरोपीने सासवड,लोणी काळभोर,देहू रोड,भोसरी,लोणीकंद या पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या तीन गुन्ह्यात फरार आहे. आरोपीला पुढील तपासासाठी सासवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,भोरचे पोलीस उपधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार विजय कांचन पोलीस नाईक समाधान नाईकनवरे,बाळासाहेब खडके,अमोल शेडगे, पोलीस कर्मचारी धिरज जाधव,महिला पोलीस कर्मचारी पूनम गुंड तसेच पौड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक
रॉकी देवकाते,साहिल शेख यांनी केलेली आहे.