Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या व खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांतून पाणीपुरवठा योजनांसाठी ७९ कोटी ८० लक्ष रक्कमेच्या योजनांना मंजुरी..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विशेष प्रयत्नांतुन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडुन तब्बल ७९ कोटी ८० लक्ष रक्कमेच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतुन या योजनांची आखणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमार्फत (MJP) करण्यात आलेली होती.यामध्ये ०५ गावे ४१ वाडया/वस्त्यांचा हा आराखडा बनविण्यात आला होता. या योजनेसाठी पाटबंधारे विभागाकडील जागा साठवण तलाव,जलशुध्दीकरण केंद्र व उंच जलकुंभ यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे.

निरा-डावा कालव्यामधील पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणासाठी पाटबंधारे खात्याने रितसर परवाना दिला आहे.तसेच या सर्व योजनांसाठी साठवण तलाव, मुख्य संतुलन पाणी टाकी,जलशुध्दीकरण केंद्र,वितरण व्यवस्था,उंच जलकुंभ,पंपहाऊस इत्यादी बाबींच्या योजनेसाठी सौर उर्जाद्वारे विज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे योजना विज देयकावरील ग्रामपंचायतीचा खर्च कमी प्रमाणात येणार आहे.

या अगोदर ४४२ कोटी रूपयांच्या ७२ गावांच्या १२ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळालेली असुन उर्वरित १०५ कोटी रूपयांच्या शिरवली,मुरूम कांबळेश्वर,कोऱ्हाळे खुर्द, कोन्हाळे बु,मेखळी,सोनगांव या नवीन प्रादेशिक योजना प्रस्तावित पाणी पुरवठा खात्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केला आहे.

प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना

१) वडगांव निंबाळकर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना – २१.६९ कोटी
२) शिरष्णे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना – १०.०८ कोटी
३) वाणेवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना -२०.६१ कोटी
४) सांगवी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना – ७.६२ कोटी
५) वाघळवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना – १९.८० कोटी

अशी माहिती योजना समितीचे समन्वयक व बारामती तालुका पुनर्विलोकन व एकात्मिक विकास समन्वय समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर,तन्मय कांबळे, उपअभियंता प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बारामती उपविभाग यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *