बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना ; प्रेमप्रकरणातून एकावर कोयत्याने वार, तिघांवर गुन्हा दाखल..!!


बारामती ( मुरूम ) : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क

बारामती तालुक्यातील मुरूम येथे प्रेमप्रकरणातून एका कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी वैभव दिपक खरात,हर्षद थोरात,सनी खुडे, सर्व ( रा.मुरूम,तळवणीनगर,ता. बारामती,जि.पुणे ) यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३०७, ३२६,३४१,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी आदित्य युवराज सोनवणे यांचे वडील युवराज नारायण सोनवणे,वय.४५ वर्षे ( रा.मुरूम,सिद्धार्थनगर,ता. बारामती,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्यादींचा मुलगा आदित्यला संशयित एक नंबरच्या आरोपींच्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून चिडून जाऊन तिघा आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला रोडवर अडवून कोयत्याने डोक्यावर आणि हातापोटांवर वार करत जीवघेणा हल्ला करत खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादींनी फिर्यादीत म्हंणटले आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *