फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जन्मदात्या आईनेच आपल्या अवघ्या पाच महिन्याच्या चिमुरड्याच्या खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.याप्रकरणी पोलीस कर्मचारी विठ्ठल काळे यांनी लोणंद पोलीसात फिर्याद दिली असुन महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाळाची आई संशयित आरती गायकवाड हिला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत लोणंद पोलीसाकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की,पांढरी तरडगाव ता.फलटण येथील आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला फोन करुन तिच्या पाच महिण्याच्या लहान बाळाला दि.१२-४-२०२२ रोजी दुपारी २ वाजता जिवे ठार मारुन पुरलेले आहे.तुम्ही लगेच गाडी पाठवा नाहीतर मी आणखी दुसऱ्या कोणाचातरी खुन करीन असे सांगितले होते.त्यावरून पोलीसांनी तिचेकडे जावुन
खात्री केली असता तिने तिचे लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड वय पाच महिने याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक तोंड दाबुन जिवे ठार मारुन खुन केला असल्याचे सांगितले.
याची माहिती लोणंद पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत या महिलेस ताब्यात घेतले.आरती गायकवाड या महिला संशयीत आरोपीला फलटण न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.लोणंद पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ज्याठिकाणी चिमुकल्याचा मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी खोदण्यात आले.असता मृतदेह मिळुन आला. या मृतदेहाचे पोस्ट मार्टम जागेवरच तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांनी केले.पुढील तपास लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत.