बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जसे महाराष्ट्रात एकामागोमाग गुन्हे दाखल झाले.तीच गोष्ट आता नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याबाबत व्हायला सुरुवात सुरुवात झाली आहे की काय,अशी शंका आता निर्माण केली जात आहे.खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत,कारण मुंबई पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या राणा दाम्पत्यावर बारामतीत देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत युवासेनेचे पदाधिकारी निखिल चांगदेव देवकाते यांनी दिलेल्या तक्रारीत राणा दाम्पंत्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळ्या जादू अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.देवकाते हे एबीपी माझ्याच्या युट्यूब चॅनेल वरती बातमी पाहत असताना, आमदार रवी राणा हे मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून साडेसाती लागली आहे. त्यामुळे हनुमान चालीसा वाचली की,त्यांचे सगळे संकट नष्ट होतील.https://youtu.be/ssRfTv0UPjE ही त्या युट्यूब चॅनेलची लिंक आहे.रवी राणा हे एक लोकप्रतिनिधी असुन,एका लोकप्रतिनिधींने सार्वजनिक माध्यमातुन अंधश्रद्धेला चालना देत आहेत. हे स्पष्ट होत असल्याचा आरोप देखील शिवसेनेने केला आहे.
तसेच खासदार नवनीत राणा या अशा महंटल्या की, उध्दव ठाकरेंना हनुमान चाळीसाचा विरोध आहे की ? हिंदुत्वाचा विरोध आहे ? त्यामुळे त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाव्यात आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था भंग व्हावी. व राज्यसरकार वरील लोकांचा विश्वास कमी व्हावा या हेतूने बोलल्याचे त्यांचे व्यक्तव्य जाणवत असुन,यांच अनुषंगाने त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवणे व राज्यसरकार वरील विश्वास कमी व्हावा या उद्देशाने कपटपूर्वक षडयंत्र रचणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख वस्ताद पप्पू माने,युवासेना शहर प्रमुख गणेश करंजे,युवासेना तालुका प्रमुख निखिल देवकाते, राजेंद्र चौधरी,नवनाथ कुचेकर, अक्षय जाधव,आकाश चव्हाण यावेळी उपस्थित होते.